सध्या सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड जोरात सुरू आहे – ‘घिबली फोटो’! लोक आपले रोजचे फोटो घिबली स्टाइलमध्ये बदलून ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर करत आहेत. पण हे घिबली फोटो नेमके आहेत काय आणि ते कसे बनवतात, हे अनेकांना माहीत नाही.
घिबली फोटो म्हणजे काय?
घिबली फोटो म्हणजे स्टुडियो घिबली या जपानी अॅनिमेशन कंपनीच्या खास शैलीत बनवलेले फोटो. स्टुडियो घिबली ही 1985 मध्ये हायाओ मियाझाकी आणि इसाओ ताकाहाता यांनी सुरू केलेली कंपनी आहे, जी ‘स्पिरिटेड अवे’, ‘माय नेबर टोटोरो’ आणि ‘हाऊल्स मूव्हिंग कॅसल’ यांसारख्या सुप्रसिद्ध अॅनिमेशन चित्रपटांसाठी ओळखली जाते. या चित्रपटांमध्ये मऊ रंग, निसर्गाचे सुंदर चित्रण, साधे पण भावपूर्ण पात्र आणि स्वप्नवत दृश्ये दिसतात. घिबली स्टाइल फोटोमध्येही हीच खासियत असते – तुमचा फोटो असा दिसतो, जणू तो हाताने काढलेल्या अॅनिमेशनचा भाग आहे.
हा ट्रेंड सुरू झाला OpenAI च्या ChatGPT-4o या नवीन अपडेटमुळे, ज्याने फोटोंना घिबली स्टाइलमध्ये बदलण्याची सुविधा आणली. आता हीच शैली लोकांमध्ये इतकी लोकप्रिय झाली की, अनेकजण आपले सेल्फी, कौटुंबिक फोटो किंवा मिम्सही घिबली स्टाइलमध्ये बनवून शेअर करत आहेत.
घिबली फोटो कसा बनवायचा?
घिबली फोटो बनवणं खूप सोपं आहे आणि तुम्ही ते मोफतही करू शकता. यासाठी AI टूल्सचा वापर केला जातो. खाली स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन दिलं आहे:
जर तुमच्याकडे ChatGPT Plus सबस्क्रिप्शन असेल, तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. पण मोफत पर्यायही आहेत, जसं की xAI चं Grok, Gemini AI, किंवा ऑनलाइन साइट्स जसे DeepAI, Craiyon, आणि Playground AI.
Grok साठी: X अॅपवर जा आणि Grok आयकॉनवर क्लिक करा. Grok 3 मॉडेल निवडा.
तुमचा फोटो निवडा (सेल्फी, मित्रांचा फोटो किंवा काहीही). Grok वर पेपर क्लिप आयकॉनवर क्लिक करून फोटो अपलोड करा. इतर साइट्सवरही अपलोडचा पर्याय असतो.
फोटो अपलोड केल्यानंतर, लिहा हा फोटो घिबली फोटोमध्ये बनवून द्या. किवा तयार करून द्या. 10 सेकंदात फोटो तयार होईल. त्यानंतर सव्ह करू शकता.
काही सेकंदांत AI तुमचा फोटो घिबली स्टाइलमध्ये बदलेल. तो फोटो डाउनलोड करा आणि सोशल मीडियावर शेअर करा!
Grok आणि इतर टूल्स: हे मोफत आहेत आणि कोणत्याही सबस्क्रिप्शनशिवाय वापरता येतात. पण काहीवेळा फोटोवर काही बदल हवे असतील, तर हाताने एडिटिंग करावं लागतं.
हा ट्रेंड मजेदार आणि क्रिएटिव्ह आहे. लोक आपले फोटो, पाळीव प्राणी, सेलिब्रिटी किंवा मिम्स घिबली स्टाइलमध्ये बदलून मजा करत आहेत. OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनीही आपला घिबली स्टाइल फोटो X वर शेअर केला होता. भारतातही अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो घिबली स्टाइलमध्ये बदलून शेअर केले आहेत.
घिबली फोटो बनवणं सोपं आणि मजेशीर आहे. तुमचा आवडता फोटो घ्या, वर सांगितलेल्या पद्धतीने तो बदला आणि सोशल मीडियावर #GhibliTrend सह शेअर करा.
