ज्या लाडकी बहीण योजनमुळे राज्यात महायुतीचे सरकार आले आहे त्याच बहिणींना अद्याप डिसेंबर महिना उजाडला तरी योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले नाही, म्हणून सर्वत्र चर्चा आहे. त्यातच आता लाडकी बहीण योजनेबाबत भाजपाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि महायुतीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना 2100 रुपये मिळण्यास अजून 7 ते 10 महिने लागू शकतात असे दिसत आहे. तसेच राज्य सरकारने जाहीर केले होते की, नोव्हेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल. मात्र नोव्हेंबर महिला उलटला तरी महिलांना या योजनेचा हप्ता मिळालेला नाही. तसेच या योजनेचे पैसे महिलांच्या महिलांच्या खात्यात येण्यास विलंब होऊ शकतो, असे भाजपाचे नेते मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवले आहे. पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपयशी ठरलेल्या महायुतीच्या यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. महायुतीने तब्बल 235 जागा जिंकल्या असून त्यांच्या या विजयाचे श्रेय लाडकी बहीण योजनेला दिले जात आहे. महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना निवडणुकीत निर्णायक ठरली असे मत अनेक राजकीय विश्लेषकांनी मांडले आहे. त्याचबरोबर महायुतीच्या नेत्यांनी देखील ते मान्य केले आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील महिलांना आश्वासन दिल होत राज्यात पुन्हा सत्ता मिळाली तर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2100 रुपये देऊ, मात्र आता त्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपयाच्या हफ्त्यासाठी पुढच्या भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
