बीएसएनएल देशाच्या कानाकोपऱ्यातील नेटवर्कसाठी नेहमी चर्चेत असते. अशातच आता BSNL ने आपल्या 4G युजर्ससाठी VoLTE सर्व्हिस सुरू केली आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी लवकरच व्यावसायिकरित्या 4G सर्व्हिस सुरू करणार आहे. 4G टॉवर्स बसवल्यामुळे कनेक्टिव्हिटी पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे. युजर्ससाठी 4G नेटवर्कवर एचडी कॉलिंग ऍक्टिव्ह करणे खूप सोपे झाले आहे. यासाठी त्यांना फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. या स्टेप्सच्या मदतीने सहज आपल्या फोनमधून एचडी कॉलिंग सर्व्हिसचा लाभ घेऊ शकता.
आपल्यी बीएसएनएल नंबरवर VoLTE ऍक्टिव्ह करण्यासाठी, युजरला त्याच्या फोनच्या मेसेजमध्ये जावे लागेल. यानंतर 53733 वर एसएमएस पाठवावा लागेल. युजर्सना मेसेजमध्ये ACTVOLTE टाइप करून 53733 वर पाठवावे लागेल. मेसेज पाठवल्यानंतर काही मिनिटांत युजरच्या नंबरवर VoLTE सेवा ऍक्टिव्ह होईल. सर्व्हिस ऍक्टिव्ह झाल्यानंतर, युजर्सच्या नंबरवरून एचडी कॉलिंग (HD Calling) करता येते. तथापि, एचडी कॉलिंग करण्यासाठी, युजरला 4G नेटवर्क असलेल्या भागात राहावे लागेल किंवा ते त्यांच्या घरातील वाय-फायशी कनेक्ट करून एचडी कॉलिंगचे फायदे देखील घेऊ शकतात.
बीएसएनएल नंबरवर एचडी कॉलिंग ऍक्टिव्ह करण्यासाठी, सर्व युजर्सनी सर्वप्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांचे सिम कार्ड अपग्रेड केलेले आहे म्हणजेच ते 4G/5G ऍक्टिव्ह सिम कार्ड वापरत आहेत. BSNL त्यांच्या 2G/3G सिमकार्ड युजर्सना मोफत 4G सिम कार्ड देत आहे. यासाठी युजर्सना त्यांच्या जवळच्या टेलिफोन एक्सचेंज किंवा कस्टमर केअर सेंटरला भेट द्यावी लागेल. आवश्यक दस्तऐवज पडताळणीनंतर, युजर्सला नवीन 4G/5G सिम कार्ड मोफत मिळेल.
