सुपरस्टार अल्लू अर्जुनला एका महिलेच्या मृत्यू प्रकरणात शुक्रवारी दुपारी अटक झाली होती. परंतु या अटकेची कारवाई दिसते तेवढी सरळसोपी नाही. उपमुख्यमंत्री असलेले पवन कल्याण हे अल्लू अर्जूनचे काका अर्थात आत्याचे पतीचे भाऊ आहेत.त्यामुळे त्यांच्याकडून मदत होणं तर लांबच परंतु त्यांच्याशी वाकडं घेतल्याने अल्लूवर जेलमध्ये जाण्याची वेळ आल्याचं बोललं जातंय.
अल्लू अर्जुनला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला असला तरी तो आपल्या काकांसमोर झुकला असता तर कदाचित त्याला जेलची हवा खावी लगली नसती. पवन कल्याण हे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये अल्लू अर्जुनने काका पवन कल्याण यांना समर्थन देण्याऐवजी त्यांचे विरोधक असलेले वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्या शिल्पा रवी रेड्डी यांना साथ दिली.
तेव्हादेखील अल्लू अर्जुनविरोधात एक गुन्हा दाखल झाला होता. परंतु त्याला एवढं गांभीर्याने घेण्यात आलेलं नव्हतं. पुढे पवन कल्याण यांच्या विजयानंतर अल्लू अर्जुनने त्यांना शुभेच्छाही दिलेल्या होत्या.
परंतु दोघांमध्ये फारसं बरं नसल्याने महिलेच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अल्लू अर्जुनने आपल्या काकांकडे मदत मागितली नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. कारण हायकोर्टात हे प्रकरण टिकणार नाही, हे अल्लूला माहिती होतं. अल्लू अर्जुनची आत्या सुरेखा यांचा विवाह पवन कल्याण यांचे सख्खे भाऊ चिरंजीवी यांच्यासोबत झालेला आहे.
